loader
Breaking News
Breaking News
Foto

बदलत्या काळात महिलांनी स्वतःची ओळख तयार करावी- सुजाता परांजपे

मालवण (प्रतिनिधी) - पूर्वी पासूनच समाजाने महिलांना एका चौकटीत बंद केले आहे. जन्मापासून समन्वयकाच्या भूमिकेत राहिलेल्या स्त्रीने या चौकटीतून बाहेर पडून आजच्या बदलत्या काळात स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील फ्लाईंग बर्ड एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडरच्या सह संस्थापिका सुजाता परांजपे यांनी येथे बोलताना केले. मसुरे देऊळवाडा येथे देऊळवाडा ग्रामस्थ महिला यांच्या वतीने आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुजाता परांजपे या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या संयोजिका योगशिक्षिका वर्षा अभ्यंकर, आर. पी. बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे, अशोक मसूरकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, जि. प. सदस्या क्षमा हडकर, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, कणकवलीचे डॉ तुळशीराम रावराणे, प्रिया कोचरेकर, प्रकाश कोचरेकर, भावना मुणगेकर, दादा वेंगुर्लेकर, ऍड. सीमा माणगांवकर, पत्रकार संतोष अपराज आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी वर्षा अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले तर ऍड. श्रेया कुलकर्णी यांनी स्वागत केले. यावेळी सुजाता परांजपे यांनी महिलांनी स्वतःला ओळखले पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपल्या कामाविषयी दुसऱ्यांकडून कौतुक होण्याची वाट न पाहता महिलांनी स्वतःच आपले कौतुक करत स्वतःला प्रोत्साहन देत राहिले पाहिजे. एखादी महिला धाडस करून स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जात असेल तर इतर महिलांनी तिला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी समाजात काम करताना अनेक महिलांचे आवाज दाबले गेल्याच्या घटना आमच्या समोर येत आहेत. अशा आवाज दाबलेल्या महिलांना न्याय देण्याचे काम आमची संस्था करीत आहे. इतर महिलांनीही अशा महिलांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. महिला या सक्षम बनल्यास वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही असे लुडबे म्हणाले. यावेळी डॉ, तुलसीराम रावराणे, प्रफुल्ल देसाई, अर्चना कोदे यांची समोयचित भाषणे झाली. शेवटी अभ्यंकर यांनी आभार मानले यावेळी महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg