loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत सोमवारी रिक्षा चालकांसाठी 'आनंद दिघे कल्याणकारी मंडळ' मार्गदर्शन मेळावा

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व आणि त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडीत सोमवारी, १६ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलांदे उपस्थित राहणार आहेत. रिक्षा चालक-मालकांनी या मंडळात का सामील व्हावे आणि त्यातून मिळणारे लाभ कोणते, यावर ते मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. सावंतवाडी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित ही बैठक सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी ठीक १० वाजता 'श्री देव नारायण मंदिर' येथे होणार आहे. सावंतवाडी शहरातील सर्व रिक्षा चालक-मालकांनी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg