loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर देवाचे गोठणे सोगमवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

देवळे (प्रकाश चाळके) - राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील सोगमवाडीतील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेचे संघटन आणखी बळकट झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी आमदार किरण सामंत यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सर्वांना पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे आश्वासनही आमदार किरण सामंत यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते विलास चाळके, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, तालुकाप्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्य कोमल नवाले, पंचायत समिती सदस्य स्पृहा गुरव, विभाग प्रमुख विनोद शेलार, प्रसाद गुरव, योगेश चव्हाण, किरण सोगम, विकास सुगम, संजय नाटेकर, विश्वनाथ सोगम, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg