loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक महिला दिनानिमित्त खांबाळे येथे महिलांचा सन्मान सोहळा

वैभववाडी (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिनानिमित्त सहेली महिला ग्रामसंघ आयोजित खांबाळे केंद्रशाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महिला सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत, असे जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार यांनी नमूद केले. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कुटुंब सक्षमपणे सांभाळावे तसेच मुलांना चांगले संस्कार देऊन उद्याची सुसंस्कृत पिढी घडवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यसेविका मनस्वी कांबळे, मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये तसेच पो.ह.आरती राठोड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर संबोधन केले. यावेळी ‘नारी शक्तीचा-गौरव स्त्री शक्तीचा’ या संकल्पनेतून वैयक्तिक व्यवसाय करणार्‍या महिला, सामूहिक व्यवसाय करणारे महिला बचत गट, गावातील सामाजिक कार्यात सहभाग घेणार्‍या महिला, सहेली महिला ग्रामसंघ पदाधिकारी, माजी सरपंच महिला तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्यरत महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जयश्री लोके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg