loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील आंबा बागायतदार संकटात; ६० कोटींच्या कर्जमाफीसह विमा निकष बदलण्याची मागणी

रत्नागिरी : गेल्या काही काळापासून बदलत असलेल्या हवामानाचा मोठा फटका कोकणच्या राजाला म्हणजेच हापूस आंब्याला बसला आहे. यंदा केवळ २० टक्केच आंबा उत्पादन हाती येण्याचा अंदाज कृषी विद्यापीठाच्या अहवालातून समोर आला आहे. यामुळे आखाती देशांत होणाऱ्या ७० टक्के निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, बागायतदारांनी आता सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आंबा व्यावसायिक आणि बागायतदार संघटनेचे पदाधिकारी विवेक भिडे आणि प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेत ही गंभीर स्थिती मांडली. कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार, यंदा बागांमध्ये केवळ २० टक्केच आंबा शिल्लक आहे. वाशी मार्केटमध्ये एरवी होणारी ६ हजार पेट्यांची आवक आता केवळ १ हजार पेट्यांवर आली आहे. यामध्ये रत्नागिरीचा वाटा फक्त ४०० ते ५०० पेट्या इतकाच मर्यादित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबा पिकासाठी बागायतदारांनी घेतलेले कर्ज साधारण ६० कोटींच्या घरात आहे. पीकच हाती नसल्याने हे कर्ज फेडणे अशक्य झाले असून, सरकारने यामध्ये तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या पीक विमा योजनेत केवळ ५ एकरपर्यंतच्या बागांनाच भरपाई दिली जाते, जी अन्यायकारक आहे. "आम्हाला विश्वासात न घेता हे निकष ठरवले जातात," असा आरोप बागायतदारांनी केला आहे. ​पाऊस मोजणीत पारदर्शकता: विमा परताव्यासाठी पाऊस हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे आता पुराव्यासाठी प्रत्येक गावात 'पर्जन्यमापक' यंत्र बसवण्यात येणार आहे, जेणेकरून विम्याच्या दाव्यांमध्ये पारदर्शकता राहील.

टाईम्स स्पेशल

​हवामानामुळे आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीला आंबा पेटीला ६,००० रुपये इतका विक्रमी दर मिळत आहे. काल कोकणातून केवळ १००० पेट्यांची आवक झाली, तर संपूर्ण राज्यातून वाशी मार्केटमध्ये ५ हजार पेट्या पोहोचल्या आहेत. ​"आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी दलाल आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक येत्या १५ दिवसांत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये विपणन आणि दरांबाबत सविस्तर चर्चा होईल." मोठे बागायतदार या व्यवसायापासून लांब का जात आहेत, यावरही चिंतन करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून बागायतदारांचे प्रश्न सोडवावेत, अशी आग्रही मागणी या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg