loader
Breaking News
Breaking News
Foto

तिथवली काझीवाडी येथील तलावात एका वृद्धाचा मृत्यदेह आढळून आल्याने खळबळ

वैभववाडी (प्रतिनिधी) - तिथवली काझीवाडी येथील अय्युब उमर इसफ वय 75 या वृद्धाचा शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तलावात मृत्यदेह आढळून आला. काल दुपारी पावणेचार वाजता ते बकऱ्यांना घेऊन घरामागील रानमाळावर गेले होते. काझी हे शेळीपालन करतात. शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरामागील माळरानात बकऱ्यांना चरावयास सोडले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते घरी येणे अपेक्षित होते. परंतु ते घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु इसफ आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, हरेश जायभाय, रणजीत सावंत हे तिथवलीला पोहोचले. त्यांनी देखील स्थानिकांच्या मदतीने परिसरात शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली असता गावातील तलावात इसफ यांचा मृत्यदेह दिसून आला. स्थानिकांनी त्यांचा मृत्यू पाण्याबाहेर काढला. त्यांची चप्पल तलावाखाठी होती. ते तलावात अंघोळीकरिता गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. याप्रकरणी अबिद अली उमर काझी यांनी पोलिसात खबर दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg