loader
Breaking News
Breaking News
Foto

शतकाहून अधिक परंपरा जपणारा खेडचा शिमगोत्सव

खेड : कोकणातील सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या खेड शहरात शिमगोत्सवाला शंभर वर्षांहून अधिक जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्ररथांची परंपरा लाभली आहे. शहरातील विविध आळ्यांमध्ये साकारले जाणारे हे चित्ररथ खेडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहेत. पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखणे चित्ररथ आणि त्यातील पात्रांची आकर्षक रंगभूषा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरा या चित्ररथांची मिरवणूक शहरातून काढली जाते. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण खेड शहर ढोल-ताशांच्या गजरात, प्रकाशझोतात आणि उत्साहाच्या वातावरणात अक्षरशः दणाणून जाते. त्यामुळे ही रात्र खेडकरांसाठी विशेष उत्सवाची ठरते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या शिमगोत्सवात कुवारसाई–साळीवाडा आळी येथील चित्ररथातून “नृसिंह अवतार” हा पौराणिक प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आला होता. तर कासार आळी–ब्राह्मण आळीच्या चित्ररथातून “श्रीगणेश जन्म” हा प्रसंग अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला. या दोन्ही चित्ररथांमधील पात्रांची आकर्षक रंगभूषा आणि वेषभूषा खेडचे ज्येष्ठ चित्रकार विनय माळी यांनी साकारली. त्यांच्या कलात्मक हातोटीमुळे चित्ररथांतील प्रसंग अधिक जिवंत आणि प्रभावी वाटत होते. नागरिकांनीही या चित्ररथांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले. परंपरा, कला आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम असलेला खेडमधील शिमगोत्सव आजही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करत असल्याचे या चित्ररथांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला चित्ररथांनी शहर दणाणले

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg