दापोली (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याने या सहयोगी प्राध्यापकाची सहाय्यक प्राध्यापक या पदावर पदानवती करून त्यांची प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे बदली करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने याच महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकाने आपला लैंगिक छळ केला असल्याची तक्रार १८ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू यांचेकडे केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या सहयोगी प्राध्यापक यांना सेवेतून निलंबित करून या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२५ रोजी एक त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने चौकशी करून नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात या सहयोगी प्राध्यापकानी आपल्या पदाचा, अधिकाराचा व शिक्षक विद्यार्थी या पवित्र नात्याचा गंभीर गैरवापर करणारे व नैतिक अध:पतन दर्शविणारे, कायदा व सेवा नियमांचे स्पष्ट उल्लंघन करणारे व शासकीय सेवेस अशोभनीय ठरेल असे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे या प्राध्यापकाची सहयोगी प्राध्यापक या पदावरून सहाय्यक प्राध्यापक या पदावर पदानवती करून त्याची प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे बदली करण्यात आली आहे. या प्राध्यापकाची दोन वर्षे सेवा शिल्लक असून त्याने केलेल्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांची पदानवती केल्याने त्यांना जबर आर्थिक फटका बसणार आहे.
टाइम्स स्पेशल
सुकिवली येथील महाराजस्व समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.