loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडगाव साखरपा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचे श्रद्धेने पालन

देवळे (प्रकाश चाळके) - शिवरायांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोंडगाव (साखरपा) पंचक्रोशीतील शिव-शंभू भक्तांकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी फाल्गुन महिनाभर “बलिदान मास” अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने पाळला जातो. या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता श्रीदेवी गिरजाई मंदिर येथे सर्व शिव-शंभुभक्त एकत्र येतात. येथे श्री भिड़े गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार “संभाजी ह्रदय” या ग्रंथातील एक श्लोक आणि ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बलिदान मासादरम्यान अनेक शिव-शंभुभक्त विविध प्रकारचे संकल्प पाळतात. काहीजण महिनाभर चप्पल न घालणे, आवडत्या भोजनाचा त्याग करणे किंवा दिवसातून एकदाच जेवण करणे असे नियम पाळतात. या माध्यमातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत कोंडगाव (साखरपा) पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सहभागाने मुकपदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाते. या उपक्रमामुळे परिसरात शिवभक्ती, इतिहासाची जाणीव आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg