loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणी पाहुणचाराची भुरळ आता सातासमुद्रापार; दापोलीतील 'होम-स्टे'ला फ्रान्सच्या पर्यटकांची पसंती

दापोली (​सागर गोवळे) -निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या कोकणच्या सौंदर्याने नेहमीच पर्यटकांना आकर्षित केले आहे. मात्र, आता केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही कोकणच्या ग्रामीण जीवनाची आणि पाहुणचाराची ओढ लागल्याचे चित्र दिसत आहे. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात, सुपारी आणि नारळाच्या दाट बागांमध्ये वसलेल्या एका कोकणी पाहुणचार होम-स्टे ला चक्क फ्रान्समधील पर्यटकांनी भेट दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहराच्या गजबजाटापासून दूर, दापोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या या होम-स्टेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद या फ्रेंच पर्यटकांनी घेतला. येथील हिरव्यागार बागा, कोकणी पद्धतीची घरांची रचना आणि घराभोवतीचा निसर्ग पाहून हे पर्यटक थक्क झाले. ​केवळ निसर्गच नव्हे, तर कोकणी खाद्यसंस्कृतीनेही या परदेशी पाहुण्यांना भुरळ घातली. अस्सल कोकणी पद्धतीने बनवलेले शाकाहारी जेवण, उकडीचे मोदक आणि सोलकढीचा आस्वाद घेताना हे पर्यटक भारावून गेले होते. ग्रामीण भागातील आदरातिथ्य आणि घरगुती वातावरण यामुळे आपल्याला मायदेशात असल्यासारखेच वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण पर्यटनाला मिळणार गती ​दापोली परिसरात वाढत असलेला हा 'होम-स्टे' पॅटर्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे. कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार वाढण्यास मोठी मदत होत आहे. फ्रान्समधील पर्यटकांच्या या भेटीमुळे दापोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, यामुळे येणाऱ्या काळात परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg