loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड व दापोली पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांची भेट घेऊन घेतले आशीर्वाद

खेड (प्रतिनिधी) : खेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. आफिया नजीब पालेकर व उपसभापती सुनील मोरे यांनी शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांची जामगे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या बिनविरोध निवडीनंतर दोघांनीही जामगे येथे जाऊन कदम यांचे मार्गदर्शन घेत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी खेड पंचायत समितीचे सदस्य, तसेच खेड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना रामदास कदम यांनी खेड तालुक्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, दापोली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उन्मेष राजे यांनीही उपसभापती नम्रता तोडणकर यांच्यासह जामगे येथे जाऊन शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दापोली तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले उन्मेष राजे यांची अलीकडेच पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

या भेटीदरम्यान रामदास कदम यांनी दापोलीचे सभापती उन्मेष राजे व खेडचे उपसभापती सुनील मोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती रामदास कदम यांनी खेडच्या सभापती डॉ. आफिया पालेकर व दापोलीच्या उपसभापती नम्रता तोडणकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg