रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान देशभरात राबवले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील रत्नागिरी शहर मंडळात हे निवासी शिबिर संपन्न झाले. या अभियानासाठी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, अभियानाचे प्रमुख मुक्ता बाष्टे, प्रसाद बाष्टे, संदीप सुर्वे यांनी नियोजन केले. हे निवासी प्रशिक्षण ल. वी. केळकर सभागृह जोशी पाळंद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन रत्नागिरी भाजप जिल्ह्यअध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या हस्ते झाले.
या प्रशिक्षण शिबिरात भारतीय जनता पार्टीचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, कार्यविस्तार आणि दृष्टिकोन, आपली कार्यपद्धती, सोशल मीडिया, मन की बात आणि आगामी कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास रत्नागिरी शहर मंडलातून 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या प्रशिक्षण अभियानामुळे भारतीय जनता पार्टीचे विचार सर्व दूर पसरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. या शिबिरात वैचारिक अधिष्ठान या विषयावर ऍडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी मार्गदर्शन केले. तर पार्टीचा इतिहास व विकास याबाबत सचिन वहाळकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्यानंतर पार्टीचा कार्यविस्तार आणि दृष्टिकोन याबाबत निलेश आखाडे यांनी तर आपली कार्यपद्धती या विषयावर डॉ. मुक्ता बाष्टे, आपल्या सरकारच्या योजना या विषयावर डॉ. ऋषिकेश केळकर यांनी मार्गदर्शन केले. तर दुपारनंतरच्या सत्रामध्ये सोशल मीडिया याबाबत निलेश मराठे व बूथ प्रबंधन आणि मन की बात आगामी कार्यक्रम या विषयावर शेखर लेले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व प्रशिक्षण गीताने झाली, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व निवासानंतर सकाळी योग प्रशिक्षण वर्गाने सांगता करण्यात आली. योग प्रशिक्षण शिबिरानंतर महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक भाजपा युवा नेते अनिकेत पटवर्धन यांनी या निवासी शिबिराबाबत मार्गदर्शन करताना झालेल्या सर्व कार्यक्रमाचे कौतुक केले. व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर संपन्न झाले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.