loader
Breaking News
Breaking News
Foto

60 लाख महिलांचे 1,500 रुपये कायमचे होणार थांबणार ?

राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 60 लाख महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने सुरू केलेल्या नव्या पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक महिलांची कागदपत्रे अपूर्ण किंवा निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पुनर्पडताळणी सुरू केली आहे. यात अर्ज करताना चुकीची माहिती देणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे, तसेच काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्याचे आढळून आले आहे. सरकारी माहितीनुसार, राज्यभरात सुमारे 1 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तपासणीदरम्यान सुमारे 60 लाख महिलांचे अर्ज निकषांमध्ये बसत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अनुदान थांबवले जाऊ शकते.

टाईम्स स्पेशल

यामध्ये खालील कारणांमुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे: * कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असणे * कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणे * आयकर भरत असणे * आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती अपूर्ण असणे * आधार, बँक खाते आणि अर्जातील माहितीमध्ये विसंगती दरम्यान, शासनाने पात्र महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अर्ज दुरुस्ती आणि कागदपत्रे अद्ययावत करण्याची संधी देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अपात्र लाभार्थ्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg