loader
Breaking News
Breaking News
Foto

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा, शोभायात्रेसह समाजोपयोगी उपक्रम

रसायनी (राकेश खराडे) - जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ - नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी खालापूर तालुक्यातील साजगाव धाकटी पंढरी समोरील मैदानावर हजारो अनुयायांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकां समवेत भव्य दिव्य अशी शोभा यात्रेसोबत विविध कला पथकांच्या उपस्थितीत वसंत कुंज साजगाव ग्रामपंचायत ते साजगाव धाकटी पंढरी या मार्गाने झाली. या शोभायात्रेत रायगड जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून आलेल्या अनुयायांची एक किलोमीटर लांबच लांब रांग लागल्याचे पहावयास मिळाले. या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांना मान्यवरांच्या हस्ते ५० मोफत कपाटांचे वाटप करण्यात आले. यावेळी जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित मान्यवर, भाविक भक्त गण व हितचिंतकांनी घेतला. यावेळी कार्यक्रम ठिकाणी हजारो भाविक भक्तगण आणि बालक यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची उपासक दीक्षा घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg