loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय समाज शास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेत श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या श्रेया गुरव हिला सुवर्णपदक

खेड (प्रतिनिधी) - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय समाज शास्त्र ऑलिम्पियाड २०२५-२६ परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता ४ थी मधून श्रेया गुरव हिने सुवर्णपदक, ५०० रूपये किमतीची भेटवस्तू आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र प्राप्त केले. तिने या यशामुळे व मेहनतीमुळे मौल्यवान अनुभव मिळविला असून तो तिला तिच्या भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना भक्ती घडशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्था शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg