loader
Breaking News
Breaking News
Foto

झिराड येथे राजिप सदस्य दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने महिलादिनी आरोग्य शिबिर

अलिबाग (वार्ताहर) - रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील झिराड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. टीसीपीएल आणि दि. मदर तेरेसा सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांचा ही या शिबिरात सहभाग होता. टीआयपीएल फाउंडेशनचे साकिब कनोरिया, काहिनी कनोरिया यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. झिराड ग्रामपंचायत माजी सरपंच दर्शना भोईर, रवींद्र म्हात्रे, महेश माने, अशोक भोईर, हरेश भोईर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोफत आरोग्य शिबिरात नेत्र चिकित्सा, इसीजी, कानाचे विकार, इतर आजारावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. जवळपास 300 हून अधिक ग्रामस्थांनी विविध आजारांवर उपचार करून घेतले. दिलीप भोईर यांनी विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य विषयक समस्यांना प्राधान्य देताना आजवर अनेक वेळा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने यापूर्वी ही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. रविवारी देखील दिवसभर भरगच्च कार्यक्रम पार पडले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg