loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली बाजारपेठेत 'गावठी सुकी काजू बी' दाखल

दापोली (​सागर गोवळे) - कोकणचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूचा हंगाम आता हळूहळू जोर धरू लागला असून, दापोलीच्या मुख्य बाजारपेठेत 'गावठी सुकी काजू बी' मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागली आहे. सध्या बाजारपेठेत या काजू बीला १५० ते १५५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ​यंदा हवामानातील बदलांमुळे काजू हंगामावर काहीसा परिणाम झाला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने काजू बी वाळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी आपली दर्जेदार गावठी काजू बी विक्रीसाठी दापोलीत आणत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात आवक मर्यादित असली, तरी मालाचा दर्जा उत्तम असल्याने व्यापाऱ्यांकडूनही याला चांगली मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​गावठी सुकी काजू बी: १५० ते १५५ रुपये (प्रति किलो) ​स्थानिक ग्राहकांसह गावठी काजूला मोठी पसंती मिळत आहे. ​गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर समाधानकारक असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, येत्या काळात आवक वाढल्यानंतर दरात चढ-उतार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे काजूच्या दर्जावर परिणाम होऊ नये, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून सध्या मिळणाऱ्या दरामुळे बागायतदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg