loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट

मुंबई - मार्चमधील १० दिवसांमध्ये तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांच्या वर नोंदला गेला. सोमवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, अकोला, अमरावती येथे उष्णतेच्या लाटेची तर रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे उष्ण आणि दमट वातावरणासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला होता. कोकण विभागामध्ये काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट जाणवू शकेल असेही सांगण्यात आले. मुंबईत किमान तापमानाही चढे होते. कुलाबा येथे २४ तर सांताक्रूझ येथे २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. अलिबाग येथे किमान तापमान सरासरीपेक्षा सहा अंशांनी अधिक, सध्या उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, शहरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी शहरात कमाल ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतके होते. या हंगामातील शहरातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, पारा ३९ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र आणि गुजरातवर जास्त दाबाची स्थिती (अँटि सायक्लोनिक) सक्रिय आहे. यामुळे हवामान कोरडे झाले असून, तापमानात मोठी वाढ होत आहे.

टाईम्स स्पेशल

याचा फटका केवळ पुण्यालाच नाही, तर संपूर्ण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यालाही बसत आहे. राज्यात सध्या सर्वाधिक तापमान अकोला येथे ४० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट आली असून, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीपार गेला आहे. दुसरीकडे, राज्यातील नीचांकी तापमान अहिल्यानगर येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg