loader
Breaking News
Breaking News
Foto

संभाव्य गॅस टंचाई परिस्थिती बाबत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असो. पदाधिकारीनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा हॉटेल असो. च्यावतीने आज जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची जिल्हाधीकारी कार्यालयात भेट घेतली. आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती चा परिणाम इंधन टंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हॉटेल व्यवसायाच्याची प्रमुख गरज असलेला गॅस सिलिंडर ची टंचाई निर्माण होत असल्याच्या बातम्या टीवी वर दाखवण्यात येत आहेत. याबाबत मान जिल्हाधिकारी महोदय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली. सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हॉटेल संघटनेच्या वतीने गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. तसे निवेदन देण्यात आले असून मान जिल्हाधिकारी महोदय यांनी याबाबत गॅस पुरवठा एजन्सी यांच्याशी बोलून यौग्य ती निर्णय घेऊ, असे आश्वासन हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आले आहे. हॉटेल संघटने चे उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई, गणेश धुरी, सुहास ठाकुरदेसाई, वायंगणकर, जोग आदी अनेक हॉटेल व्यावसायिक या मीटिंगसाठी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg