loader
Breaking News
Breaking News
Foto

ECI ने बंगाल, केरळसह या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा केल्या जाहीर

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोग आज, रविवार, 15 मार्च रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या तारखांची घोषणा केली. या वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "आम्ही पाच राज्यांसाठी 25 लाख अधिकारी तैनात केले आहेत. यामध्ये 850,000 सुरक्षा दलांचा समावेश असेल. 2,18,000 मतदान केंद्रे उभारली जातील."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशभरातील 5 राज्यांमध्ये सत्तेसाठीची लढाई आता सुरू होणार आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये 9 एप्रिल रोजी, तर तमिळनाडूत 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत 23 एप्रिलला तर, दुसरा टप्पा 29 एप्रिलला मतदान असेल. सर्व पाचही राज्यांमध्ये 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg