कळंबोली : होळीचा सण म्हटला की उत्साह, रंग आणि परंपरा डोळ्यासमोर येतात. मात्र, पाली येथील गवळी समाजाच्या होळीवर एक अनोखी आणि ऐतिहासिक प्रथा जोपासली जाते. होळीच्या माळावर वेगवेगळ्या आकाराचे आणि वजनाचे जड, गोल दगडी गोटे ठेवलेले असतात. या दगडांना स्थानिक भाषेत ताकदीचे प्रतीक मानले जाते. हे जड दगड उचलून आपली शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची मर्दानी रांगडी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. येथील 64 वर्षीय संजय आप्पा घोसाळकर यांनी चक्क 65 किलो वजनाचा पारंपरिक 'धोंडा' (दगड) उचलून होळी भोवती फिरून तरुणांना फिटनेसचा मंत्र दिला.
पालीत होळीच्या सणांमध्ये विविध आळीतील वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या होळ्या ह्या लावल्या जातात. आजही ती परंपरा अनेक दशकापासून जपली जाते. या प्रत्येक होळीच्या माळावर 50,60,70 किलोचे दगडी गोटे हे ठेवलेले आहेत. होळी लागल्यानंतर प्रत्येक ओळीतील सर्वच समाज बांधव हे होळीची बोंब मारण्यासाठी गावातून फेरफटका मारतात. यावेळी प्रत्येक समाजातील प्रत्येक आळीतील तरुण हे त्या होळी वरील असलेले विविध प्रकारचे वजनी गोटे उचलून खांद्यावरून पलीकडे टाकात असत किंवा खांद्यावर उचलून होळीला पूर्ण प्रदक्षिणा मारत असत. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे ती आजतागायत जपली गेली आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.