loader
Breaking News
Breaking News
Foto

ईगल फाऊंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव

रत्नागिरी - क्षेत्र कोणतेही असो स्त्रीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे, असे मत डी. वाय एस. पी. राधिका फडके यांनी महिला दिनाच्या औचित्याने व्यक्त केले. ईगल फौंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ.शिल्पा सुर्वे, जि.प.सदस्या सौ.नेत्रा नवनीत ठाकुर श्रीमती कीर, विलास कोळेकर, सागर पाटील, बाबासाहेब राशिनकर, प्रकाश वंजोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सौ. वैदही रानडे (रत्नागिरी),श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई), सौ. सुमेधा सावळ(सिंधुदुर्ग), सौ. रुपाली विक्रम यादव (शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने (देवराष्ट्रे), अश्विनी संजय पाटील (कराड), ऍड.स्नेहल भिमराव गुरव (कोल्हापूर), सौ. व श्री सुलक्षणा आनंदा कांदळकर(राधानगरी), सौ.सौनल संजोग खातू (रत्नागिरी , सौ. शुभांगी दामोदर कोंडे, डॉ. सुमिता संजय शिर्के, श्रीमती प्रमोदिनी विठ्ठलराव किनाके (यवतमाळ), सौ. वर्षा परशुराम ढेकणे, डॉ. किर्ती ऋषिकेश कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना मानपत्र, सन्मानचिन्ह व कोल्हापूरी फेटा बांधून गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg