loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये ‘गूज मनीचे’ नाट्यप्रयोगाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्ये असलेल्या रामायण आणि महाभारतातील नायिकांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा ’गूज मनीचे’ हा संशोधनाधारीत आणि प्रयोगशील नाट्यप्रयोग पनवेलमध्ये उत्साहात संपन्न झाला. नादकला थिएटर अँड फिल्म्स निर्मित या अभिनव नाटकाचा शुभारंभ आणि पहिला प्रयोग आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रयोगावेळी माजी खासदार किरीट सोमैया, मेधा किरीट सोमैया, प्रिया सावंत, साक्षी परांजपे, अभिषेक पटवर्धन, शामनाथ पुंडे, चिन्मय समेळ, वैभव बुवा, आदित्य उपाध्ये, निखील गोरे, सुनीता खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg