loader
Breaking News
Breaking News
Foto

काळबादेवी येथील सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते सत्कार

युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे) काळबादेवी येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा व क्रीडाक्षेत्रात विशेष प्रविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत अनन्या अमित मयेकर, आरोही सूचित मयेकर, यश दिनेश बिर्जे व शुभ्रा गणेश भोळे यांना मोठे यश प्राप्त झाले. तर क्रीडा स्पर्धेत अनुज अमोल शेट्ये (लांब उडी- तालुकास्तर) यश दिनेश बिर्जे (बुद्धिबळ-तालुकास्तर), अन्वी विनय मयेकर (लांब उडी- केंद्रस्तर) तर पूर्वी ऋषिकेश शेट्ये हिला (धावणे-केंद्रस्तर) प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड, सहाय्यक शिक्षक महेश आरेकर, वैशाली झोरे व अमृता काजवे यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेत खेळायला मैदान नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मिळणारे दैदीप्यमान यश बघून भारावून गेलो असून शाळेला मैदान प्राप्त होण्यासाठी विशेष मेहनत घेऊ, असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख यांनी केले. या सत्काराप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख व शिक्षकवर्गासह ज्येष्ठ शिवसैनिक बंडयाशेठ पेटकर, शाळा कार्यकारिणी मंडळाच्या उपाध्यक्षा सावली सूचित मयेकर, अंगणवाडी सेविका राखी भोळे, युवासेना समन्वयक साई गावडे, काळबादेवी शाखाप्रमुख ओंकार सत्यजित(सत्या) वायंगणकर, उपाशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, युवासेना स्थानिक प्रतिनिधी रणजितसिंग मालगुंडकर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भुवड यांनी मान्यवरांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg