loader
Breaking News
Breaking News
Foto

पेट्रोलियम पदार्थ व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात खेड काँग्रेस चे निवेदन

खेड (दिलीप देवळेकर) - देशात सध्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत सातत्याने वाढ करुन सामान्य नागरिकांस अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला आहे. यापुढे कुटुंबाचे मासिक अर्थकारण कोलमडले असून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली UPA सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या तरी त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला गेला नाही. अनुदानाच्या माध्यमातून जनतेला देण्याचे काम करण्यात आले होते. परंतु सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करून जनतेची अर्थिक कोंडी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर सुमारे ४०० रुपायाच्या आसपास उपलब्ध होत होता. परंतु आता एका सिलेंडरसाठी ९०० रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे. याशिवाय सिलेंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा कालावधीही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीही १९०० रुपयांच्या पुढे गेल्या असून त्याचा थेट परिणाम हॉटेल, खाणावळी, छोटे व्यावसायिक आणि सामान्य ग्राहकावर होत आहे. परिणामी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारकडून गॅसची टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य नागरिक तसेच छोटे व्यावसायिक, हॉटेल चालक, खानावळी चालक यांना गॅस सिलेंडर वेळेवर आणि सहज उपलब्ध होत नाहीत. तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना येऊन घेऊन जा असे सांगितले जाते. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

टाईम्स स्पेशल

वरील पार्श्वभूमीवर, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शांततामय व लोकशाही मार्गाने निवेदन प्रतः मा. उपविभागीय अधिकारी, खेड यांना अजीम अ. रहेमान सुर्वे तालुकाध्यक्ष, खेड यांच्या मार्गदर्शना खाली अजीम सुर्वे, अध्यक्ष, फैसल देसाई, राबिया जसनाईक, महिला अध्यक्ष, मंगेश भैरवकर, प्रफुल्ल शेवरकर, तौफिक पोत्रिक, नाझिमा तांबे, नासर जसनाईक, मुराद लाडघरकर, तब्बससूम तिसेकर, मुस्तुफा करविणकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg