loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये तर उप सभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध

देवरूख (सुरेश सप्रे) -संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती पदावर शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये यांची तर उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल बाईत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवरूख पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती व उप सभापती निवडणूक पार पडली. सभापती पदासाठी परचुरी गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उप सभापती पदासाठी निवे गणातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप गट) प्रचंड मतांनी विजयी झालेले प्रफुल्ल बाईत यांची निवड करण्यात आली. या पदासाठी विरोधात दुसरे कुणीही अर्ज दाखल न केलेने निवडणूक बिनविरोध झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्यावर विश्वास दाखवत निवडून आणण्यासाठी पाठबळ दिले व आता पंचायत समिती सभापती म्हणून संधी दिली आहे. या पदाचा उपयोग तालुक्याच्या जन सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे शर्वरी वेल्ये यांनी बोलताना सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg