संगलट खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुका हा पर्यटन तालुका असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. दापोली शहर, आणि समुद्रकिनारपट्टीवरील हॉटेल तसेच स्वीट मार्ट व्यावसायिकांना सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असल्याने संबंधित व्यावसायिकांनी दापोली तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. दिनांक १२ मार्च २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दापोलीतील गॅस वितरण एजन्सीकडून व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होणे कठीण झाले असल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले आहे.
गॅस उपलब्ध नसल्यास हॉटेल व्यवसाय चालवणे कठीण होणार असून, यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दापोली शहर व परिसरातील तसेच समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल आणि स्वीट मार्ट व्यावसायिकांनी गॅस वितरण एजन्सींना व्यावसायिक सिलेंडरचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत लेखी व तोंडी आदेश द्यावेत, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी दापोली शहरातील व तालुक्यातील व्यावसायिक उपस्थित होते. तहसीलदार यांनी सांगितले आहे की ही समस्या संपूर्ण देशामध्ये आहे तरीपण आपण दापोली हा पर्यटन तालुका असल्यामुळे लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून हॉटेल व्यवसायिकांचा प्रश्न सोडविला जाईल. तसेच आपले निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.