loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री छत्रपती शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित चित्र रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लांजा आणि मॅक्स मोबाईल पॉईंट लांजा व बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेली श्री छत्रपती शिवजन्मोत्सवा निमित्त चित्र रंगभरण 2026 स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या स्पर्धा पहीली ते बारावी विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम विद्यादीप इंग्लिश स्कूल लांजा शाळेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार, रांगोळीकार कीरण बेर्डे, विद्यादीप ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य अमोल जाधव, मॅक्स मोबाईल पाॅईंटचे सर्वेसर्वा, हरेश पटेल, नरेश पटेल, सर्वळे. आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी- नववी ते बारावी गट- प्रथम समृद्धी विक्रांत डोळस, द्वितीय तैजीब अब्दुल करीम बोबडे, तृतीय सानवी जितेंद्र भालेकर, उत्तेजनार्थ ओंकार विलास पाष्टे पाचवी ते आठवी गट -. प्रथम आयान सिराज नेवरेकर, द्वितीय आरोही शरद परब, तृतीय ईश्वरी प्रसाद माने, उत्तेजनार्थ अधिराज अभिजीत राजेशिर्के. पहिली ते चौथी गट- प्रथम रुद्र विजय चव्हाण, द्वितीय जानवी सुनील कामेरीकर, तृतीय श्रेया प्रशांत करळकर, उत्तेजनार्थ युगा महेश पोवार स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांना वस्तू स्वरूपातील बक्षिसे मॅक्स मोबाईल पाॅईट वतीने मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रुती पाताडे यांनी केले तर आभार श्रुती गुंडये यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg