loader
Breaking News
Breaking News
Foto

सापडलेला हार, नेकलेस केला परत आबलोलीच्या अमित पवार यांचा प्रामाणिकपणा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अडूर ते पालशेत दरम्यान रस्त्याच्या बाजूला सापडलेल्या कापडी पिशवीत हार आणि नेकलेस या किमती वस्तू आढळून आल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या आबलोली येथील अमित अशोक पवार यांनी सबंधित व्यक्तीला परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. आबलोली येथील अमित पवार हे दि. ९ मार्च रोजी दुपारी 3:30 च्या दरम्यान अडूर पेट्रोल पंप येथून मोटरसायकलने अडूर ते पालशेत असे जात असताना रस्त्याच्या बाजूला एक कापडी पिशवी मिळाली. त्यांनी ती पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये दोन सफेद रंगाच्या साड्या तसेच एक प्लास्टिकचा बॉक्स त्यामध्ये गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस व गळ्यातील एक ग्रामचा हार असे मिळून आल्याने त्यांनी त्या ठिकाणी थांबून सदर पिशवीच्या मालकाचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अशावेळी त्यांनी आबलोली चेक पोस्ट येथील पोलीस अंमलदार गायकवाड यांना भेटून ही गोष्ट सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी शोध घेतला असता पालशेत येथील जयराज पटेकर हे त्या ठिकाणी आले व त्यांनी त्यांची कापडी पिशवी हरवली असून त्यामध्ये त्यांच्या बहिणीचे कपडे व सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. गायकवाड यांनी अमित पवार व जयराज पटेकर यांच्याकडे चौकशी करून त्यांना गुहागर पोलीस ठाणे येथे हजर राहण्यास बाबत कळविले. स्वतः जयराज पटेकर यांच्याकडे चौकशी केली असता सदर हरवलेली कापडी पिशवी व त्यामधील असणारे सोन्याचे दागिने व कपडे पोलीस ठाणे येथे खात्री करून परत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg