मालवण (प्रतिनिधी) आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. महिलांनी स्वतः पुढाकार घेत हिरीरीने काम केल्यास देशाची प्रगती अधिक गतीने होईल. मालवण पंचायत समिती मधील महिला सदस्यांनी तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे, यासाठी प्रशासनाचे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी येथे बोलताना केले. मालवण पंचायत समिती येथे महिला दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती महिला सदस्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी या थोर स्त्रियांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सावंत, गटशिक्षणाधिकारी संजय माने, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. उल्का खोत आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित जि. प. सदस्या वर्षा सांबारी, पं. स. सदस्या योजना कांबळी, प्रज्ञा चव्हाण, माधुरी मसुरकर, रिया बावकर, पं. स. सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण, गणेश तोंडवळकर, दीपक सुर्वे यांचा गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समिती मधील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सावंत, सौ. उल्का खोत, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. परब तसेच जि. प. व पं. स. सदस्यांनी विचार मांडत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)






























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.