loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार

दापोली (सागर गोवळे) - ९ मार्च २०२६ मंत्रालय, मुंबई येथे पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत पोलीस पाटील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस पाटलांचे मानधन वेळेवर देणे, पोलीस पाटलांना लावल्या जाणाऱ्या वाळू डूट्या रद्द करणे, प्रवास भत्ता दुप्पट करणे, अनुकंप कायदा लागू करणे, सेवा निवृत्तीनंतर एक रकमी 20 लाख रुपये देणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि त्यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg