loader
Breaking News
Breaking News
Foto

न्हावेलीत मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा (प्रतिनिधी) - नुकतेच भव्य मोफत नेत्र आणि ह्रदयरोग तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. न्हावेली ग्रामपंचायत, डॉ.राणे हॉस्पिटल आणि डॉ.गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अक्षय पार्सेकर, तज्ज्ञ डॉक्टर आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची शुगर, रक्तदाब आणि ईसीजी तपासणी करुन मोफत वैद्यकीय सल्ला दिला. तसेच अत्याधुनिक मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या योजनेंतर्गत डोळ्यांच्या विविध शस्रक्रिया आणि ह्रदयरोगाशी संबधित एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी या सुविधा पात्र रुग्णांना मोफत मिळणार आहेत. सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांनी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले. तर उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सहभागी संस्थांचे आभार मानले. या शिबिरात रुग्णांना पुढील उपचारांसाठी २० टक्के सवलत जाहिर करण्यात आली असून माफक दरात चष्मे वाटप आणि मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. ग्रामपंचायत कर्मचारी आणि आरोग्य पथकाने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg