रत्नागिरी : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल, खानावळी, रेल्वे, रुग्णालये तसेच महाविद्यालयांच्या कॅन्टीनच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे ६० रुपयांची वाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या तरी त्याचा भार सर्वसामान्यांवर पडू दिला नव्हता. मात्र सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून नागरिकांची आर्थिक कोंडी करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, रत्नागिरी शहराध्यक्ष अशपाक काद्री, लांजा तालुकाध्यक्ष राजेश राणे, कौशल फाळके, नंदन गांगण, पांडू काका कवितके, अशोक जाधव, अल्ताफ ठाकूर, जैनुल सारंग, इरफान होडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.