loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गावडे यांचे निधन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : इन्सुली कोंडवाडा येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या जयश्री दत्ताराम गावडे (वय ८४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथील एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. जयश्री गावडे या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे तसेच विद्या विकास मंडळ इन्सुलीचे संचालक तथा माजी सैनिक किरण गावडे यांच्या मातोश्री होत. तसेच सावंतवाडी येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. नीता चंद्रकांत गावडे यांच्या त्या सासू तर अ‍ॅड. कौस्तुभ गावडे यांच्या आजी होत. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्वपरिचित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी सकाळीच त्यांच्या पार्थिवावर इन्सुली कोंडवाडा येथील स्थानिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg