संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जागतिक महिला दिनानिमित्त आंबेड बुद्रुक येथे महिलांसाठी अंतरा फाउंडेशन च्या माध्यमातून कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. महिलांना सजावटीचे साहित्य तयार करणे, यामध्ये डोअर हँगिंग, रांगोळी मॅट, प्लास्टिक फुलांचे गजरे इ. विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. अंतरा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. सोनगिरी येथील अंगणवाडी सेविका फराह मुजावर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कोळंबे गावातील कामिनी ताई पडवळ या आशा सेविका आणि होम गार्ड अशी दुहेरी जबाबदारी अगदी जिद्दीने सांभाळत असून त्यांचा सन्मान करण्यात आला.
चैत्राली गेल्ये या महिला कब्बड्डी खेळाडूला उत्कृष्ट खिलाडू वृत्तीमुळे सन्मानित करण्यात आले. भाजपा महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ताई ढेकणे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सर्व प्रशिक्षण शिबिराचे कौतुक केले. यावेळी देवरुख शहर अध्यक्षा शीतल पंडित, उपाध्यक्ष सुमन झगडे, तालुका सरचिटणीस रोहिणी सुर्वे, रत्नागिरी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, अंतरा फाउंडेशनचे सचिव तथा भाजपा तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर, उपाध्यक्षा सरिता आंबेकर, पूजा मुळ्ये, श्वेता मादूस्कर, अपर्णा शिगवण, साक्षी शिगवण, कविता टाकळे, रेश्मा मोहिते यांच्या सह महिला वर्ग उपस्थित होता. अंतरा फाउंडेशन अध्यक्षा तथा भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस नुपुरा मुळ्ये यांनी सर्वांचे आभार मानले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.