रत्नागिरी - काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे रुक्मिणी विठ्ठल रांबाडे वय - ७० वर्षे. यांच्या चेहऱ्याला असलेली टयुमरची गाठ काढण्यात यश आले असून तिला नव्याने जीवनदान मिळाले आहे. तसेच वयोमानानुसार या महिलेला ह्दय रोग होता. अशा गंभीर परिस्थितीत तिच्या वर योग्य उपचार करुन तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या टयुमर गाठीची शस्त्रक्रिया करणे हे फार जोखमीचे काम होते. अगदी कॅन्सर सारख्या आजारावर देखील याचे रुपांतर झाले असते. लवरात-लवकर महिलेची शस्त्रक्रिया करून ती गाठ काढणे आवश्यक होते.
चेहऱ्याच्या नसांना इजा न पोहोचवता ट्यूमर काढण्यासाठी डॉ. सुनिता बागे कान, नाक, घसाशास्त्र विभागप्रमुख यांनी सुपरफिशियल पॅरोटिडक्टॉमी (लाळ ग्रंथीची शस्त्रक्रिया) मध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन वैद्यकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. तसेच चेहऱ्याला लकवा मारण्यापासून त्या महिलेला वाचवले. भूलतज्ज्ञ डॉ.जमशेर शेख अणि डॉ.प्रियांका साळूंके यांनी रुग्णाची संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दक्षता घेतली. ऑपरेशन थिएटरमधील नर्सिंग स्टाफ, विशेषत: स्टाफ नर्स भावना यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली. रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात प्रथमच एवढी गंभीर आजाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ही बाब अगदी अभिमानास्पद आहे.
अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे सुमारे काही हजारो ते लाख रु. खर्च येण्याची संभावना असते परंतु आपल्या शासकीय रुग्णालय येथे महिलेकडून एक ही रुपया न घेता ही शस्त्रक्रिया नि:शुक्लपणे करण्यात आली आहे. ही गोष्ट फार मोठी आहे. या उल्लेखनीय कामाचे श्रेय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज हे कार्य शक्य झाले आहे. तसेच डॉ. विनोद सांगवीकर वैद्यकीय अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी जे स्वतः एक उत्कृष्ट अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत त्यांनी देखील कौतुक केले, अशा अनुभवी ENT सर्जन आपल्या रुग्णालयला लाभल्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.