loader
Breaking News
Breaking News
Foto

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंगळवार 17 रोजी रत्नागिरीत डॉ. उदय निरगुडकर ऐकण्याची श्रोत्यांना पर्वणी

रत्नागिरी - विविध पॉडकास्टच्या माध्यमातून दररोज विविध महत्वपूर्ण विषयांवर आपल्याजवळ माहितीयुक्त संवाद साधणारे चतुरस्त्र, अभ्यासु वक्ते, आयटी क्षेत्रात, प्रसारमाध्यम क्षेत्रात, विविध कार्पोरेट क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत ज्यांनी आपला ठसा उमटवला असे प्रख्यात वक्ते डॉ. उदय निरगुडकर मंगळवार दि. 17 मार्च रोजी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात सायंकाळी 6.15 वाजता अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या आत्मकथा असलेल्या ‘सहकार स्वरुपा’ पुस्तक प्रकाशनासाठी येणार आहेत. प्रकाशनाचे औचित्य साधून ते विविध विषयांचा परामर्श घेतील. डॉ. उदय निरगुडकर यांचा अभ्यासपूर्ण विवेचनाचा लाभ घेण्यासाठी श्रोत्यांनी मंगळवार दि. 17 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक स्वामी स्वरुपानंद पतसंस्था यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg