loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड श्री भैरीभवानीनगर येथील श्रीस्वामी समर्थ मंदिरात २०, २१ मार्च रोजी प्रकट दिन व पालखी सोहळा

खेड - खेड येथील खेड-शिवतर रोड श्रीभैरी भवानीनगर मंदिरात अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी होणाऱ्या प्रकटदिन सोहळ्याच्या विविध कार्यक्रमाबरेबरच शनिवार दि.२१ मार्च २०२६ रोजी पालखी परिक्रमा सोहोळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या वाजतगाजत, लेझीमच्या तालावर, चित्ररथ, उंट, हत्तींच्या सहभागाने मंगलमय आणि शांततेच्या वातावरणात निघणा-या न भूतो न भविष्य अशा पालखी सोहोळ्यात सर्वच महिला स्वामी भक्तांनी भगवी साडी तर पुरुष भक्तांनी पांढरा झब्बा लेहेंगा असा पारंपरिक पद्धतीचा वेष परिधान करून पालखी सोहोळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी ६ - श्रींचे पूजन, सकाळी ७ श्रींचे जन्मोत्सव कीर्तन, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता लघुरुद्र.. दुपारी १२:३० श्रींचा मुखवास, सायंकाळी ४ दिंडी सोहोळा, सायंकाळी ५:३० मंदिर परिसरात सवाद्य पालखी परिक्रमा सोहोळा, सायंकाळी ७आरती आणि सायंकाळी ७ ते रात्री १० महाप्रसाद व संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. शनिवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरातून पालखीचे सवाद्य प्रस्थान होणार असून ही पालखी महात्मा फुले नगर मार्गे - छत्रपती शिवाजी महाराज चौक - वाणीपेठ- गांधी चौक -पानगल्ली - गुजरआळी पावसकर नाका -सोनार आळी-बाजारपेठ-हनुमान पेठ-कोष्टी आळी - संत रोहिदास नगर संतसेना नगर - योगायोग सोसायटी मार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर श्रीभैरी भवानीनगर खेड येथील मंदिरात पालखी येऊन रात्री ९ वाजता भोजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन व पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.

टाईम्स स्पेशल

श्रींना २१०० पुरण पोळींचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तरी ज्या त्यांनी मंदिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जमा कराव्यात अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे. अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संदीप सासने, दिवाक्र नांदगावकर, गुणाजी खेडेकर, वैभव जंगम, मंगेश पवार, बाळू वर्मा, उल्हास शेलार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg