loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची बेस्ट इन स्कूल म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये स्पर्धेतील प्रथम फेरीत इयत्ता १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांच्या वयोगटात प्रशालेतील इयत्ता १ ली मधील पारस साधले, इयत्ता ३ री मधील निधी पेडणेकर, इयत्ता ४ थी मधील वेद बेळगावकर, प्रार्थना नाईक व आरोही गावडे, तर इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांच्या वयोगटातील इयत्ता ६ वी तील भूमी नानोस्कर, भुवन दळवी तसेच इयत्ता ७ वी तील तनिष्क पवार व पूर्वी आरोलकर यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर विद्यार्थ्यांची अंतिम फेरी दि. ७ मार्च २०२६, शनिवार रोजी बी. एस बांदेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. वरील निवडून आलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी पुढील चार विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुयश प्राप्त झाले. त्यामध्ये, इयत्ता १ ते ४ थी विद्यार्थ्यांच्या वयोगटात प्रशालेतील इयत्ता ३ री मधील वेद बेळगावकर याने प्रथम क्रमांकाचे स्थान, प्रार्थना नाईक हिने तृतीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तर इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांच्या वयोगटात इयत्ता सातवीतील पूर्वी आरोलकर हिने द्वितीय क्रमांकाचे स्थान व इयत्ता सहवीतील भुवन दळवी याने तृतीय क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्याचवेळी दिलेल्या विषयावर चित्र काढून आपल्यामधील सर्जनशीलता प्रदर्शित केली.

टाईम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर प्रथम फेरीत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कला शिक्षिका सुषमा पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg