loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

दापोली (वार्ताहर ) : गतवर्षीप्रमाणे या वर्षी दिनांक 21,22 मार्च 2026 शनिवार, रविवार रोजी दापोली मधे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. कोळथरे येथील कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत या दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाणार असून या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय असणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये दापोली परिसर आणि एकूणच कोकणातील संस्कृती, लोककला, विविध कला, सादर करणाऱ्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळणार असून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, दिनांक 21 रोजी, सायंकाळी 5:30 वाजता या महोत्सवाचे उ‌द्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, विधान परिषद आमदार सौ उमा खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी सायंकाळी दापोलीची सांस्कृतिक विशेषता दाखविणारे काटखेड जाखडी यांचे सादरीकरण देखील असणार आहे तसेच उ‌द्घाटनानंतर दापोलीतील प्रतीथयश कलाकारांचा भक्तीरंग या थीमवर आधारित सोहळा रंगणार आहे. भक्तीरंग या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, वादन, चित्रकला, गायन या सगळ्यांचा अनोखा संगम आणि सादरीकरण दापोलीकरांना अनुभवायला मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२२ तारखेला दिवसभर चित्रकला आणि रांगोळी यांचे प्रदर्शन देखील असणार आहे. २२ च्या सायंकाळी सूर तेच छेडिताः सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, ऋषिकेश रानडे, सुप्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब आर्चिस लेले कमलेश भडकमकर यांच्या संचाचा सुरेल कार्यक्रम असणार आहे. या महोत्सवा सरम्यान कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कला स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दोन प्रकारच्या स्पर्धा असतील. एकल (individual) आणि सामूहिक (group). २० तारखेला दुपारी एकल स्पर्धामधील चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रिल्स या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. २१ आणि २२ तारखेला सामूहिक मधील खालूबाजा, कोकणातील लोककला (काटखेळ , जाखडी. कोळी नृत्य इ.), नाट्यछटा व भजन इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा आयोजित करण्यामागे आपल्या परिसरातील कलाकार आणि कला यांना वाव मिळावा, ते अधिकाधिक लोकांसमोर यावेत आणि प्रोत्साहित व्हावेत हा उ‌द्देश असल्याचे स्पर्धा संयोजक श्रीप्रीती वैद्य यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

प्रथम : १००००/- चषक ‌द्वितीय: ७०००/- + चषक तृतीयः ५०००/- + चषक व्यक्तिगत (एकल) स्पर्धाची बक्षिसे : प्रथम : ३०००/- + चषक द्वितीय : २०००/- + चषक तृतीय : १५००/- + चषक या सर्व स्पर्धामध्ये अधिकाधिक कलाकारांनी, सांस्कृतिक मंडळे, भजनी मंडळे, महिला व युवा मंडळे यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महोत्सवाचे संयोजक मिहीर महाजन यांनी समस्त दापोली तालुकावासियांना केले आहे. या कार्यक्रमाच्या आणि स्पर्धाच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने युवा प्रेरणा कट्टा टीमचा सहभाग आहे. या सांस्कृतिक महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कै. मामा महाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीनदादा पाटणे, गंगाराम इदाते, मिहीर महाजन, डॉ. प्रसाद करमरकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg