loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐनारी येथे एक आगळी वेगळी परंपरा असलेला शिमगोत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) - ऐनारी येथे एक आगळी वेगळी परंपरा असलेला शिमगोत्सव विशेषतः 'शायरी तमाशा' हा खेळ आजही मोठ्या दिमाखात खेळला जातो. आज गुरुवार दि. १२ मार्च रोजी हा उत्सव हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पांडवकालीन पर्यटन स्थळ ऐनारी गावची खास ओळख आहे. येथील श्री देव गांगेश्वर देवालय प्रसिद्ध आहे. ऐनारी देवस्थानातील हा नऊ दिवसांचा उत्सव असून, या उत्सवासाठी मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या उत्सवादरम्यान माहेरवाशीणी येवून पालखीची ओटी भरतात. या शिमगोत्सवात पारंपरिक पध्दतीने 'शायरी तमाशा' खेळण्याची आजही प्रथा सुरू आहे. होळीपासून नऊ दिवस हा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी पूजा अर्चा तसेच रात्री ढोल ताशांच्या गजरात, आभीर गुलालांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात पालखी नाचविली जाते. त्यानंतर विविध देवदेवतांची सोंगे काढली जातात. असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. तरी भाविकांनी या सरत्या खेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन ऐनारी ग्रामस्थांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg