सावंतवाडी (प्रतिनिधी) - तालुक्यातील कुणकेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक आणि थरारक असा प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हा हुडोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि मुंबईतील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने भाविकांनी केलेली दगडफेक. ‘भल्ली-भल्ली भावयच्या’ जयघोषात हजारो भाविकांनी या थरारक सोहळ्याचा अनुभव घेतला.
उत्सवाची सुरुवात आंबेगावचे श्री देव क्षेत्रपाल आणि कोलगावचे श्री देव कलेश्वर यांनी आपली बहीण श्री देवी भावई हिची भेट घेऊन केली. तिन्ही गावांच्या सीमेवर या भावंडांची पारंपरिक भेट झाल्यानंतर आंबेगाव, कोलगाव आणि कुणकेरीची निशाणे हुड्याच्या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर तीन अवसारांनी कौल घेऊन एकामागोमाग एक शंभर फुटी गगनचुंबी हुड्यावर चढाई केली. यावेळी खाली उपस्थित असलेल्या भाविकांनी अवसारांच्या दिशेने दगडफेक केली. ज्याचा दगड अवसाराला लागतो, तो व्यक्ती भाग्यवान मानली जाते, अशी येथील पूर्वापार श्रद्धा आहे. या उत्सवात रोंबाट, वाघ शिकार आणि घोडेमोडणी हे विशेष आकर्षण ठरले. वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी कुणकेरकर कुटुंबातील सदस्य थेट लंडनहून गावात दाखल झाले होते. तसेच पारंपरिक पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे खेळही उत्साहात पार पडले. महिला वर्गाची मोठी उपस्थिती असलेल्या या सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले. सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असलेला हा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब उपस्थित होते. त्यांनी श्री देवी भावईचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. “कुणकेरी येथील श्री देवी भावईचा हुडोत्सव हा कोकणातील समृद्ध परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव आपल्या संस्कृतीचे जतन करणारा आहे. या पवित्र प्रसंगी सर्व भाविकांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.”


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.