loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे गुहागर विधान सभा क्षेत्राच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बळवंत यांच्यासोबत रुग्णालयातील रुग्णाच्या गैरसोयीबाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी चर्चा केली. गुहागर ग्रामीण रुग्णालयाबाबत अनेक रुग्णाच्या तक्रारी वाढत आहेत. त्याबाबत आपण लक्ष द्यावे ही विनंती करण्यात आली. यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, शुंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण, उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे, संतोष खाबे‌ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg