loader
Breaking News
Breaking News
Foto

विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भावूक, मंत्री आदिती तटकरे यांनाही अश्रू अनावर

सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा जाहीर केल्या. राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलत असताना सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या. सुनेत्रा पवार या भावूक असतानाही बोलत राहिल्या. त्यांचे शब्द ऐकून बाजूला बसलेल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू अनावर झाले. सभागृहात अत्यंत शांतता यावेळी पसरलेली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्या अर्थसंकल्पात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम केलं होतं", अशी सुनेत्रा पवार यांनी आठवण काढली आणि त्या भावूक झाल्या. पण तरीही त्यांनी आपलं भाषण पुढे सुरु ठेवलं. "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व माता-भगिणींसह, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मी मनापासून शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते", असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

टाईम्स स्पेशल

"आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर. आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद तडलेली आहे. आजची स्त्री अशाच जिद्दीने संकाटांना सामोरी जात स्वत: चा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करुयात", असं सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg