loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तहसीलदार कार्यालयातील पोलीस कस्टडीत शिरला सर्प; सर्पमित्राने केले सुरक्षित रेस्क्यू

संगलट खेड (प्रतिनिधी) : दापोली येथील तहसीलदार कचेरी परिसरातील पोलीस कस्टडीमध्ये काल रात्री अचानक एक सर्प शिरल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सर्पमित्राने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या सर्पाला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक १३ मार्च रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या पोलीस कस्टडीमध्ये एक सर्प शिरल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कस्टडीत सर्प शिरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच दापोली, शिवाजीनगर येथे राहणारे प्रसिद्ध सर्पमित्र सुरेश खानविलकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत कौशल्याने त्या सर्पाला कस्टडीतून बाहेर काढले आणि त्याला सुरक्षितरित्या पकडले. सर्पाला पकडल्यानंतर सर्पमित्र खानविलकर यांनी त्याला सुरक्षितरीत्या फॉरेस्ट ऑफिसर (वन अधिकारी) यांच्या ताब्यात दिले आहे. या मोहिमेमुळे पोलीस कस्टडीतील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, सर्पमित्राच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg