loader
Breaking News
Breaking News
Foto

राज सावंत याची यूथ नॅशनल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जाकीमिर्‍या गावचा सुपुत्र आणि भगवती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू राज सावंत याची भुवनेश्वर येथे होणार्‍या २६ व्या यूथ नॅशनल व्हॉलीबॉल २०२६ स्पर्धेसाठी अंडर-२१ वयोगटात निवड झाली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह मिर्‍या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज सावंत हा भगवती स्पोर्ट्स क्लबचा मेहनती आणि होतकरू खेळाडू असून त्याने सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही यशस्वी झेप घेतली आहे. त्याच्या खेळातील गुणवत्ता आणि कामगिरी लक्षात घेऊन त्याची राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. भुवनेश्वर येथे होणार्‍या या २६ व्या यूथ नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील उत्कृष्ट खेळाडू सहभागी होणार असून त्यात राज सावंत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज सावंतच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत तसेच त्याला कळत-नकळत मदत करणार्‍या सर्वांचे योगदान आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सदस्य रेडीस सर तसेच त्यांच्या सहकार्‍यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. राज सावंतच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून जाकीमिर्‍या व मिर्‍या गावाचे नावही क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. त्याच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन होत असून पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg