वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकिय अधिकारी यांच्या सेवेमधील वागणूकीबाबत वरवेली ग्रामस्थांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बळवंत यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयानुसार आम्ही वरवेली गावातील ग्रामस्थ व आम्हास सहकार्य करणारे राहुल कनगुटकर यांनी आमच्यावतीने आपल्याकडे ग्रामिण रुग्णालयमधील वैद्यकिय अधिकारी यांच्या वर्तनाबाबत व सेवेबाबत अनेक वेळा तक्रार अर्ज केले होते. परंतु आपणाकडून याबाबत कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. संबंधित डॉ. निलेशकुमार ढेरे यांनी आपली खाजगी सेवा चालू ठेवावी, याबाबत आम्हा ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे नाही. परंतु ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर म्हणून कार्यरत राहून रुग्णांच्या सेवेमध्ये दिरंगाई करण्यापेक्षा किंवा मी ग्रामीण रुग्णालयामध्ये फक्त आयुर्वेदिक सेवा करेन, असे सांगून रुग्णांना त्रास कसा होईल असेच वागत असल्याचे जाणवत आहेत.
संबंधीत डॉक्टर यांना आपल्याकडून राहूल कनगुटकर व सहकारी यांच्या समक्ष समज देण्याचे काम करण्यात आले होते, परंतु आपण समज देवून सुध्दा संबंधीत डॉक्टर यांनी आपल्या आदेशाचे कोणतेही पालन केल्याचे दिसत नाही. जर संबंधीत डॉक्टर आपल्या वरिष्ठांचे आदेश सुध्दा मानत नसेल तर, यापुढे त्यांच्याकडून आम्ही जनतेने कोणत्याप्रकारे विश्वासाची अपेक्षा करावी हे आपणच सांगावे ...? असेही म्हटले आहे...संबंधीत डॉक्टरांबाबत गेली दोन वर्षांपासून तक्रार असतानासुध्दा आपणांकडून संबंधीतांना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचे आम्हास जाणवत आहे. एवढे होऊनसुध्दा संबंधीत डॉक्टरांमध्ये मागील दोन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा होताना जाणवली नाही.
असे असताना आता कोणत्या प्रकारे ग्रामस्थ म्हणून आम्ही यावर विश्वास ठेवावा. आम्ही वरवेली ग्रामस्थ व राहुल कनगुटकर यांनी यावर वारंवार तक्रार केल्यानंतर आपण संबंधीत डॉक्टर यांनी आपल्याकडे खुलासा केला असल्याचे सांगून त्यांनी आपली खाजगी सेवा मागील ८ दिवसांपासून बंद केल्याचे कळविले आहे. परंतु मागील दोन ते तीन वर्षे याबाबत तक्रारी करून सुध्दा व आपण समज देवूनसुध्दा सदर खाजगी सेवा सुरूच होती हे ते स्वतः खुलासा करून मान्य करत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बळवंत यांच्याजवळ चर्चा करताना तसेच निवेदन देताना वरवेली गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड, राज विखारे, राहुल कनगुटकर, अशोक रावणंग, सुधाकर शिंदे, संजम शिंदे, उमेश आगरे, रघुनाथ शिंदे, शैलेश आगरे, रघुनाथ आगरे, तेजस शिंदे, शैलेश शिंदे, विजय आगरे, सचिन शिंदे, प्रीतम शिंदे, उद्धव चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.