loader
Breaking News
Breaking News
Foto

एलपीजी गॅस टंचाईची भीती बाळगू नका; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मदत क्रमांक जाहीर

ठाणे (प्रतिनिधी) - जागतिक युध्द परिस्थिती विचारात घेता इंधन व घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्याबाबत व अनियमिततेस पायबंद घालण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आपत्ती व्यवस्थान कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२३३८८२७/ दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०१७४० हा आहे. घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीतपणे सुरु असल्याचे तेल कंपनीने स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यास्तव नागरिकांनी टंचाईच्या गैरसमजातून आवश्यकता नसताना घरगुती गॅस सिलेंडरचे प्रि-बुकींग करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमे, नागरिक, गॅसधारक व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या सुविधेकरीता तसेच तक्रारी व शंकांचे निरसनाकरिता या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg