loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यातील व्यावसायीकाकडून २ लाखाची खंडणी मागणा-या दोन इसमांना ठाणे गुन्हे शाखेकडून अटक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे येथे गौरव स्विट्स या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टाॅलवर महापालिकेमार्फत कारवाई करण्याची भिती दाखवून या दुकानाचे मालक/व्यावसायीक विरल भानजी पटेल, यांच्याकडे दोन इसम ५,००,०००/-रू. खंडणीची मागणी करीत असलेबाबत तक्रारी अर्ज प्राप्त होता. तडजोडीअंती दुकान मालकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने शुक्रवारी अटक केले आहे. ठाणे न्यायालयाने दोघांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ठाण्यात विरल पटेस हे गौरव स्विट्स ॲण्ड नमकीन या दुकानाचे मालक असून त्यांच्या दुकानाच्या ठाणे शहरात सुमारे १२ शाखा आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील कॉसमॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजवकर हा त्यांच्या दुकानात आला. त्याने स्वतःला माहीती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगून फोटो काढण्यास सुरुवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच महापालिकेत तक्रार करून दुकानांवर कारवाई करवून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर ‘महिन्याला काही रक्कम द्या, नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू’ असे सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्याने ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरू ठेवला. याच दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे याने पटेल यांना व्हॉट्सअ कॉल करून अक्षय करंजवकरसोबत तडजोड (सेटलमेंट) करून देण्याचे सांगितले. सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. खंडणी विरोधी पथकाकडे प्राप्त झालेल्या सदर अर्जाचे चौकशी मध्ये दोन इसम हे व्यावसायीक विरल पटेल, यांचेकडे खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे कडुन वसंत विहार शाळेसमोरील चौक, ठाणे येथे सापळा रचून संशयीत आरोपीत नामे सुशांत संजय सुर्वे, वय ३० वर्षे, व्यवसाय एजंट, रा. १२०३, ऑलिवीया वेरीटॉन, बी. विंग, मानपाडा, ठाणे (प.) २) अक्षय जयंत करंजवकर, वय ३५ वर्षे, व्यवसाय एजंट, रा. ६०२, सौरभ टॉवर, कोलबाड रोड, प्रताप सिनेमा जवळ, ठाणे (प.) यांना व्यावासायीक विरल पटेल यांच्याकडून तडजोडीअंती २,००,०००/- रूपये खंडणी घेतांना दि. १३ मार्च २०२६ रोजी रंगेहाथ पकडलेले आहे. त्यांचे विरूध्द चितळसर पो. स्टे येथे भारतीय न्याय संहिता ३०८ (२), ३(५) अन्वेय गुन्हा दाखल केला असुन दोन्ही आरोपीतांना १६ मार्च २०२६ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर झाला आहे.

टाईम्स स्पेशल

गुन्हयाचा पुढील तपास सपोनिरी पल्लवी ढगेपाटील, गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे या करीत आहेत. सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (आ.गु.शा/अति. कार्यभार गुन्हे शाखा) पराग मणेरे, मा. सहा. पोलीस आयुक्त (शोध १ गुन्हे) शेखर बागडे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनि पल्लवी ढगेपाटील, पोहवा विनायक जगताप, पोहवा संदिप शिंदे, पोहवा हर्षद तारी, पोना सचिन बंडगर या पथकाने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg