loader
Breaking News
Breaking News
Foto

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 ची रत्नागिरी जिल्ह्याची कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी: पंडित दीनदयाळ उपाध्याय महा अभियान रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यशाळा चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव होते. त्यांनी महाअभियान प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. अभियानाचे जिल्हा संयोजक मकरंद ऊर्फ आशिष खातू यांनी प्रशिक्षण संदर्भात सविस्तर माहिती दिली. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील 12 मंडलांमध्ये निवासी कार्यशाळा संपन्न होणार आहेत. यासंदर्भात उपस्थितीत मंडल अध्यक्षांना योग्य त्या सूचना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केल्या. कार्यशाळेतील वक्त्यांना देण्यात येणाऱ्या सात प्रमुख विषयांबाबत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले, तर मकरंद ऊर्फ आशिष खातू यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातून 31 अनुभवी वाक्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये या कार्यशाळा संपन्न होणार आहे. या कार्यशाळेमध्ये एकूण सात सत्र असतील. या वैचारिक कार्यशाळेत इतिहास आणि विकास, वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी व अंमलबजावणी, बुथ व्यवस्थापन, सोशल मीडिया यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांना पक्षबांधणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, प्रशिक्षण महाअभियान जिल्हा समितीचे संयोजक मकरंद ऊर्फ आशिष खातू, वर्षाताई ढेकणे, राहुल पवार, योगेश शिर्के, संदेश ओक यांच्यासह रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील सर्व मंडलांचे अध्यक्ष, तसेच महाअभियान समितीतील संयोजक व सहसंयोजक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg